Nagpur Thackeray vs Shinde : नागपुरातील शिवसेनेचे 10 पदाधिकारी ठाकरे गटाच्या मार्गावर
नागपूर जिल्ह्यात शासकीय समित्यांवर भाजपचा वरचष्मा असल्याने जिल्ह्यातील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना या समितीवर स्थान मिळत नाही. त्यामुळे शिंदे गटाचे पदाधिकारी नाराज आहे. आधी जिल्हा नियोजन समितीमध्ये शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना डावलण्यात आलं आता नुकत्याच जाहीर झालेल्या संजय गांधी निराधार योजनेच्या समितीवर देखील शिंदे गटाच्या लोकांना स्थान मिळालं नाही. त्यामुळे शिंदे गटातील दहा पदाधिकारी परत ठाकरे गटाच्या मार्गावर असल्याचा दावा नागपूर ग्रामीणचे जिल्हा प्रमुख देवेंद्र गोडबोले यांनी केलाय...