Nagpur :10,12वीच्या परीक्षांंवर बहिष्कार?रखडलेली भरती,रखडलेल्या अनुदानासाठी शिक्षण संस्थाचालक आक्रमक

Continues below advertisement

फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी केंद्र म्हणून शाळेच्या इमारती आणि आवश्यक कर्मचारी वर्ग मिळणार का?? परीक्षा वेळेवर होऊ शकणार का?? असे अनेक प्रश्न सध्या निर्माण झाले आहेत.. कारण राज्यभरातील शिक्षण संस्थाचालक दहावी बारावीच्या परिक्षांवर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहेत. रखडलेली शिक्षक भरती, मोठ्या संख्येने रिक्त असलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जागा, शासनाकडे रखडलेले शेकडो कोटींचे शिक्षकेतर अनुदान या कारणामुळे शाळा आणि शिक्षण संस्था डबघाईस आल्याचं शिक्षण संस्थाचालकांचं म्हणणं आहे.... जोवर सरकार  प्रलंबित मागण्यांबद्दल निर्णय घेत नाही तोवर परीक्षांसाठी इमारती उपलब्ध करु देणार नाही असा इशारा शिक्षण संस्थाचालकांनी दिलाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram