Nagpur Car Accident Case : ..तर पुण्यापेक्षाही भयानक घटना घडली असती; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरार
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNagpur Car Accident Case : मद्यधुंद कारचालकाकडून अंमली पदार्थाचंही सेवन? धक्कादायक बाबी समोर
नागपूर : पुण्यातील अपघात प्रकरण राज्यभर गाजत असतानाच दुसरीकडे नागपूर शहरातील दाटीवाटीचा परिसर असलेल्या महाल परिसरातील झेंडा चौकाजवळ एका मद्यधुंद कारचालक तरुणाने तीन जणांना उडवल्याची घटना घडली आहे. या घटनेत पायी जाणारी महिला, पुरुष आणि तीन महिन्याचा चिमुकला जखमी झाला आहे. या बाळाची अवस्था गंभीर असल्याची माहिती आहे.
कारचालक आणि त्याच्यासोबत गाडीत बसलेले त्याचे इतर दोन सहकारी मद्यधुंद अवस्थेत होते. त्या गाडीत दारूच्या बाटल्याआणि गांजासदृष्य वस्तू सापडल्या आहेत. कारमधील एकाला जमावाने ताब्यात घेत पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. तर त्याचे इतर दोन सहकारी पळून गेले होते. पोलिसांनी आता त्या दोघांनाही अटक केली आहे. कारमधील तीनही तरूण दारूच्या नशेत होते. ते अमली पदार्थाच्या नशेत होते का हे पाहण्यासाठी त्यांची वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे.