Nagpur Swine Flu : नागपुर जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा धोका वाढला ABP Majha

Continues below advertisement

नागपुर जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा धोका वाढला आहे... आत्तापर्यंत नागपूर विभागात स्वाईन फ्लूमुळे ५ जणांचा मृत्यू झालाय...तर ७५ रुग्ण स्वाईन फ्लू बाधित आढळले आहेत.... मृतांमध्ये नागपूर जिल्ह्यातील चौघांचा समावेश असून त्यापैकी तिघे नागपूर शहरातील तर एक जण ग्रामीण भागातील होता... तर पाचवा रुग्ण नागपूर जिल्हा बाहेरील असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे... उपराजधानीत स्वाइन फ्लू हळुवारपणे हातपाय पसरवत आहे का असा प्रश्न निर्माण झालाय... महापालिकेला महाराष्ट्र राज्य आरोग्य संचालनालयाकडून स्वाईन फ्लू संदर्भात ५ हजार लसी उपलब्ध झाल्या असून महापालिकेने ते प्राधान्याने गर्भवती महिलांना उपलब्ध करुन देण्याचे ठरवलं आहे....  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram