Nagpur : धनगर समाजाला अनुसूचित जमाती अंतर्गत आरक्षण देऊ नये, नागपुरात आदिवासी संघटनेचं बेमुदत उपोषण
मराठा आणि कुणबी समजानंतर आता आदिवासी समाज विरुद्ध धनगर समाज एकमेकांच्या समोरासमोर आले आहेत... धनगर समाजाला अनुसूचित जमाती अंतर्गत आरक्षण देऊ नये या मागणीसाठी आजपासून नागपूरच्या संविधान चौकात आदिवासी समाजाच्या वेगवेगळ्या संघटना बेमुद्दत साखळी उपोषण करणार आहेत.