Nagpur Dhangar Community : मोर्चा संपवून परतलेल्या परभणीच्या पालममधील गाडीला अपघात
abp majha web team
Updated at:
12 Dec 2023 05:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपुरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनावर धनगर समाजाने काल मोर्चा काढला होता. हा मोर्चा संपवून परतत येताना परभणीच्या पालम इथल्या सरफराजपूर या गावातील पाच मोर्चेकरांच्या गाडीला अपघात झाला. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. रात्री तीनच्या सुमारास माहूरजवळ पाठीमागून अज्ञात वाहनाने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. ज्यात दोन जण जागीच गतप्राण झाले.