Nagpur Dengue : मुसळधार पावसामुळे नागपुरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ ABP Majha
Nagpur Dengue : मुसळधार पावसामुळे नागपुरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ
आता बातमी आहे नागपुरातून. नागपुरात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. जुलै महिन्यांत नागपुरात डेंग्यूचे 80 रुग्ण आढळले आहेत. तर जानेवारी ते जुलैदरम्यान हीच रुग्णसंख्या 153 वर पोहोचलीये. नागपूर पाठोपाठ विदर्भातील बुलढाण्यातही डेंग्यूचा प्रकोप झालाय. बुलढाण्यात जुलै महिन्यांत डेंगूचे 40 रुग्ण आढळून आलेत, जुलैमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे डेंग्यूच्या रुग्ण संख्येत भर पडल्याचं डॉक्टरांनी सांगितले. तसंच कुणीही घाबरुन न जाता प्रत्येकानं खबरदारी घेण्याचं आवाहन यावेळी पालिका प्रशासनानं केलंय.
Tags :
Nagpur