नागपुरात पोलीस कर्मचाऱ्याला गुंडांनी चाकूनं भोसकलं; अवैध वाळू उपसाप्रकरणी कारवाई केल्याने हल्ला

Continues below advertisement

नागपूर जिल्ह्यातील कन्हान मध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यावर चाकू हल्ल्याची घटना घडली आहे. रवी चौधरी असे हल्ला झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून या हल्ल्यात रवी चौधरी गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर नागपूरच्या वोकहार्ट रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे कळतंय या घटनेमागे अवैध धंदे करणारे गुंड कारणीभूत असल्याची माहिती समोर आली आहे. चाकू हल्ला करणारा आरोपी कमलेश मेश्राम हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या व त्याच्या भावाच्या अवैध धंद्यावर रवी चौधरी याने नुकतंच कारवाई केली होती. त्याचाच राग मनात धरून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आले आहे.
काल रात्री साडे आठच्या सुमारास रवी चौधरी पेट्रोलिंगवर असताना आरोपींनी चौधरी यांना फोन करून गौरहिवरा चौक बोलावले. चौधरी त्या पोहोचताच कमलेश मेश्राम याने त्यांच्याशी वाद घातला आणि त्यानंतर चौघांनी मिळून चौधरी यांच्यावर चाकू हल्ला पोट आणि पाठीवर अनेक वार करत रवी चौधरी याना जखमी केले. जखमी अवस्थेतील चौधरी यांना आधी कामठीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती खालावत असल्यामुळे त्यांना रात्री उशिरा नागपूरच्या वोक्हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या ते आयसीयू मध्ये मृत्यूशी झुंझ देत आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram