Nagpur Crime | गुन्हेगारीत पाटण्यानंतर नागपूर दुसऱ्या क्रमांकावर
ऑरेंज सिटी म्हणून ओळखलं जाणाऱ्या नागपूर शहरात गेल्या काही वर्षांत गुन्हेगारी वाढली. त्यानंतर क्राईम सिटी म्हणूनही नागपूरला संबोधलं गेलं. आता गुन्ह्यांच्या बाबतीत नागपूरने राष्ट्रीय पातळीवर दुसरा क्रमांक पटकावला आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने यासंदर्भात अहवाल जारी केला आहे.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार वर्ष 2019 मध्ये दर एक लाख लोकसंख्येमागे हत्येच्या प्रकरणात नागपूर दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत बिहारची राजधानी पाटणा प्रथम क्रमांकावर आहे.