Nagpur Crime : नर्सिंग होमचे सहा भ्रूण भंगारवाल्याच्या हाती, CCTV मधून सत्य समोर
नागपूरच्या लकडगंजमधील क्वेटा कॉलनी परिसरात दोन दिवसांपूर्वी सहा अर्भक सापडल्यानं एकच खळबळ उडाली होती. हे सर्व अर्भक नागपूरच्या पुरोहित नर्सिंग होममधील असून ते सर्व प्रीझर्व म्हणजेच जतन करून ठेवलेले होते. नर्सिंग होममधील भंगार उचलताना भंगारवाल्याने ते अर्भक क्वेटा कॉलनी परिसरात फेकले, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. २०१६ मध्ये पुरोहित नर्सिंग होमच्या संचालिका प्रशिक्षक डॉक्टरांना शिकवायच्या. त्यासाठी त्यांनी काही अर्भकांचं जतन करुन ठेवलं होतं. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्यानंतर हे नर्सिंग होम बंद होतं.. नुकतंच या नर्सिंग होमचं नुतनीकरण करण्यात आलं. यावेळी नर्सिंग होममधील भंगाराची विक्री करण्यात आली आहे. त्यामध्ये हे अर्भक होते. मात्र, हे अर्भक उपयोगाचे नसल्याने भंगरवाल्याने ते फेकून दिले, असं पोलीसांकडून सांगण्यात आलंय. अजूनही पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत..