Nagpur Crime : एसयूव्ही कारमध्ये तीन लहान मुलांचा सापडला मृतदेह, मुलं खेळताना कार लॉक झाली?
abp majha web team
Updated at:
19 Jun 2023 10:53 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपूरमधून एक धक्कादायक बातमी आहे. एका एसयूव्ही कारमध्ये तीन लहान मुलांचे मृतदेह सापडल्यानं खळबळ उडालीय. नागपूरच्या फारुख नगर परिसरातली ही घटना आहे. ४ वर्षांचा तौफिक खान, ६ वर्षांची आलिया खान आणि ६ वर्षांची आफरीन इर्शाद खान अशी या मृत मुलांची नावं आहेत. शनिवारी दुुपारी ३ पासून ही तिन्ही मुलं बाहेर खेळत होती. पण संध्याकाळ झाली तरी मुलं परत न आल्यानं आई-वडिलांना काळजी वाटू लागली, आणि मग त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी शोध सुरू केल्यावर अखेर रविवारी संध्याकाळी एका कारमध्ये त्यांचे मृतदेह आढळले.