Nagpur CNG Rate : नागपुरात सीएनजीचे दर 10 रुपयांनी कमी
नागपूरकरांसाठी मोठी बातमी आहे.. नागपुरात सीएनजीचे दर 10 रुपयांनी कमी झालेत. आंतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक वायूचे दर कमी झाल्यामुळे नागपूरकरांना मोठा दिलास मिळाला आहे. एका वर्षांत नागपुरात सीएनजी २६ रुपयांनी स्वस्त झाला आहे. ऑगस्ट २०२२मध्ये नागपुरात सीएनजी ११६ रुपये प्रति किलो होता. तोच दर आता ८९ रुपये ९० पैशांवर आला आहे.