Nagpur Central Jail झालं गुन्हेगारांचा अड्डा, पोलिसांच्या कारवाईतून समोर आली धक्कादायक माहिती

Continues below advertisement

नागपूरचे सेंट्रल जेल गुन्हेगारांसाठी कठोर शिक्षेऐवजी ऐशोआराम ची जागा बनली आहे का?? काही गुन्हेगार सेंट्रल जेल मधूनच आपले गुन्हेगारीचे नेटवर्क चालवत आहे का?? नागपूर पोलिसांनी काल सेंट्रल जेलमध्ये केलेल्या मोठ्या कारवाई नंतर असे प्रश्न निर्माण झाले आहे.. कारण गोपनीय माहितीच्या आधारावर करण्यात आलेल्या या कारवाईत जेलमधील काही गुन्हेगार जेलच्या आत अमली पदार्थ, बिर्याणी, चिकन - मटण, उबदार कपडेच बोलवत नाही. तर जेल मधूनच साक्षीदारांना धमक्या ही देत असल्याचे उघड झाले आहे... धक्कादायक बाब म्हणजे हे सर्व गैरप्रकार जामिनावर सुटलेल्या काही गुन्हेगारांच्या मार्फत राबविले जात असून यामध्ये जेलमधील काही भ्रष्ट कर्मचारी सुद्धा सहभागी असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी जेल मध्ये कैदेत असलेले दोन सराईत गुन्हेगार, जामिनावर सुटलेले तीन गुंड यांच्या सह जेल मधील दोन कर्मचाऱ्यावर गुन्हा नोंदविला आहे. सर्वात लाजिरवाणी बाब म्हणजे या सर्व प्रकारासाठी एक खास रेट कार्ड अमलात होते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram