Nagpur Accident | हेल्मेट असतं तर जीव वाचला असता; नागपुरात दुचाकीच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
Continues below advertisement
नागपुरात राम कुलर चौकात दोन दुचाकीच्या धडकेत एका युवकाचा मृत्यू झाला आहे. रचित मदने असं मृत तरुणाचं नाव आहे. काल सकाळी हा अपघात झाला. रचितची दुचाकी दुसऱ्या दुचाकीला जाऊन धडकल्यानंतर रचित रस्त्यावर असलेल्या दुभाजकाला जाऊन धडकला. अपघाताची ही दृश्यं कदाचित प्रेक्षकांना विचलित करु शकतात. अपघात झाला त्यावेळी रचितने हेल्मेट घातलेलं नव्हतं, कदाचित जर रचितने हेल्मेट घातलं असतं तर त्याचा जीव वाचला असता. त्यामुळे एबीपी माझा प्रेक्षकांना आवाहन करतं की, कृपया विनाहेल्मेट दुचाकीवरुन प्रवास करु नका.
Continues below advertisement