BJP Letter to Uddhav Thackeray : नागपुरात भाजपचं 'फडणवीस आमचा अभिमान' अभियान, ठाकरेंना 30 हजार पत्र
abp majha web team
Updated at:
15 Jul 2023 11:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेवेंद्र फडणवीस हे फक्त नागपूरचे नाही.. तर संपूर्ण देशाचे अभिमान आहेत... अशा आशयाचे तब्बल 30 हजार पत्र उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर पाठवण्यात येणार आहेत. हा उपक्रम भाजपच्या युवा वॉरियर्सनी हाती घेतला आहे... नागपुरात "देवेंद्र फडणवीस आमचा अभिमान" असे अभियान भाजपच्या युवा वॉरियर्सने सुरू केले आहे.. या अभियानाच्या माध्यमातून नागपुरातील प्रमुख चौकांवर आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन भाजपचे युवा वॉरियर्स तरुणांशी संपर्क साधणार आहेत आणि त्यांच्याकडून "देवेंद्र फडणवीस फक्त नागपूरचे नव्हे तर संपूर्ण देशाचा अभिमान आहे" या मजकुराचे पत्र लिहून घेणार आहेत...