Nagpur | भूतबाधा झाल्याचं सांगत भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार
नागपुरात एक भोंदू बाबावर विश्वास ठेवणे एका कुटुंबाला चांगलेच महागात पडले आहे. कारण भूत बाधा दूर करण्याच्या नावाखाली भोंदू बाबाने त्या कुटुंबातील चार महिलांवर बलात्कार केल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी भोंदू बाबा धर्मेंद्र निनावेला अटक केली असून त्याची चौकशी केली जात आहे.