Nagpur Major Rajeev Bopche : मेजर राजीव बोपचे पुन्हा फरार, बाथरूममधील ग्रील तोडून सोडला कॅम्प

लष्कराच्या ताब्यातून मेजर राजीव बोपचे पुन्हा फरार झाल्याचं समोर आलंय. बोपचे यांची पंजाबमधील भटिंडा येथे पोस्टिंग होती. मात्र, फेब्रुवारी २०२० मध्ये लष्कराने त्यांना फरार घोषीत केले होते. तेव्हापासून त्यांचा शोध सुरू होता. त्यांच्या संदर्भात लूक आउट नोटीसही जारी करण्यात आली होती. त्याच नोटीसीच्या अंतर्गत २९ जुलै २०२३ रोजी नागपूर विमानतळावरच्या इमिग्रेशन विभागाने त्यांना थांबवले होते. गार्ड रेजिमेंटचे अधिकारी त्यांना घेऊन कामठीमधील आपल्या तळावर गेले होते. त्यावेळी लष्कराचा बंदोबस्त असतानाही बोपचे हे बाथरूममधील ग्रील तोडून पुन्हा एकदा फरार झाले आहेत.

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola