Nagpur : रेशीमबागेतील कार्यक्रमात अजित पवार गटाची गैरहजेरी, संघानं निमंत्रण देऊनही दांडी

Nagpur : रेशीमबागेतील कार्यक्रमात अजित पवार गटाची गैरहजेरी, संघानं निमंत्रण देऊनही दांडी
दरवर्षी हिवाळी अधिवेशन सुरू असताना भाजपचे आमदार एक दिवस संघाच्या रेशीमबाग कार्यालयात जातात, तिथे आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतात आणि संघ प्रचारकांकडून दिल्या जाणाऱ्या बौद्धिक मध्ये सहभागी होतात.. यंदा भाजप आमदारांसह मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या आमदारांनाही बोलावण्यात आले होतं. शिंदे गटाचे काही आमदार पहिल्यांदाच सहभागी झाले. तर अजित पवार यांच्यासह त्यांच्या गटाच्या आमदारांनी या कार्यक्रमापासून दूर राहणं पसंत केलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा वेगवेगळ्या कारणानं या कार्यक्रमाला जाऊ शकले नाहीत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola