Nagpur Agniveer : नागपुरात अग्निवीर भरतीसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी, तरूणांचा मोठा प्रतिसाद
abp majha web team
Updated at:
17 Sep 2022 09:34 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपुरात मध्यरात्रीपासून अग्निवीर भरती प्रक्रिया सुरु झालीय. मानकापूर क्रीडा संकुलात ही भरती होतेय. विदर्भातल्या तरुणांना या भरतीमुळे सैन्यात दाखल होण्याची संधी मिळाली आहे. अग्निवीर भरतीसाठी विदर्भातील हजारो तरुण सहभागी होतील असा अंदाज असल्यानं प्रशासनानं पुरेशी तयारी करून त्यांना अनेक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. औरंगाबादमध्ये झालेल्या भरतीच्या वेळी उमेदवारांना रस्त्यावर राहण्याची वेळ आली होती. या पार्श्वभूमीवर नागपुरात मानकापूरच्या क्रीडा संकुलात भरतीसाठी येणाऱ्या तरुणांची थांबण्याची व्यवस्था करण्यात आलीय.