Nagpur : विधिमंडळ परिसरातील मूळ शिवसेनेचं कार्यालय कुणाला मिळणार? ABP Majha
शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये रस्सीखेच सुरूच आहे... मात्र आता नागपूरमधील विधिमंडळ परिसरातील मूळ शिवसेनेचं कार्यालय कुणाला मिळणार यावरुन आता जोरदार रस्सीखेच पाहायला मिळेल... कारण येत्या 19 डिसेंबरपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे... अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवार रंगरंगोटी आणि डागडुजीचं काम सुरु आहे. मात्र विधिमंडळ परिसरातील मूळ शिवसेना पक्षाच्या कार्यालयाचा बोर्ड रंग लावून मिटवण्यात आलाय.. त्यामुळे मिटवलेल्या या बोर्डावर कोणाचं नाव कोरलं जाणार याकडे सर्वांचं लक्ष आहे...
याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी...