Nagpur : पती-पत्नीच्या वादातून अॅसिड हल्ला, महिलेच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर जखमा
Continues below advertisement
नागपुरात ३५ वर्षीय महिलेवर अॅसिडसदृशय द्रव्य टाकल्याची घटना घडलीय. नागपुरातील ज्योतीनगर रस्त्यावर घडलेल्या या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. सविता जेंगणे असं या महिलेचं नाव आहे. सकाळी ही महिला सायकलवरुन कामावर जात असताना दुचाकीस्वाराने तिच्या चेहऱ्यावर हे अॅसिडसृशय द्रव्य फेकलं. या हल्ल्यामुळे ही महिला सायकलवरुन खाली कोसळली. या हल्ल्यात या महिलेच्या चेहऱ्यावर आणि खांद्यावर जखमा झाल्यात. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पोलीस आरोपीचा शोध घेतायत.
Continues below advertisement