Nagpur Accident Case : भरधाव कारने दोन महिलांना उडवलं; आरोपी मोकाट,थरकाप उडवणारा व्हिडीओ

Nagpur Accident News नागपूर : राज्याची उपराजधानी नागपूर हे सर्वार्थानं सुरक्षित असे शहर असल्याचे सांगण्यात येतं. इथल्या प्रत्येक रस्त्यावर पोलिसांची करडी नजर असून शहरात हजारो कॅमेऱ्यांनी सज्ज आहे. मात्र, याच स्मार्ट सिटी नागपूरमध्ये (Nagpur) एक निर्दोष महिला आपल्या मैत्रिणीसोबत मॉर्निंग वॉक करायला निघाली असता या महिलेला एक कारने बेदरकारपणे अक्षरक्ष: उडवलं. त्यानंतर ही कार इथवरच थांबली नाही तर नंतर तिला कारच्या चाकाखाली दोनदा अमानुषपणे चिरडलेही.7 मे ला सकाळच्या सुमारास ही थरारक घटना घडली.

मॉर्निंग वॉकला गेलेल्या ममता आदमने यांना चिरडणाऱ्या कार आणि या कार चालकाचा शोध लावण्यात मात्र पोलीस (Nagpur Policeतीन आठवड्यानंतर ही अपयशी ठरले आहेत. या अपघातात ममता आदमने यांचे अनेक हाड फ्रॅक्चर झाले असून अद्याप त्या अंथरुणावरच पडून आहेत. या घटनेमुळे स्मार्ट सिटी नागपूरातील सुरक्षेसाठी लावलेले कॅमेरे परत एकदा कूचकामी ठरल्याचे यातून निष्पन्न झाले आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola