Nagpur Accident : नागपूरमध्ये शेकोटीत भाजून 68 वर्षीय वृध्देचा मृत्यू : ABP Majha
हिवाळ्याच्या दिवसात तुम्ही जरी शेकोटी पेटवत असाल, तर ही बातमी तुम्हाला सावध करणारी आहे... कारण नागपुरात संध्याकाळच्या थंडीत शेक घेण्यासाठी पेटवलेल्या शेकोटीने भाजल्यामुळे एका 68 वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला आहे... लीलाबाई झोडापे असे मृत्यू झालेला आजीचे नाव असून त्या नागपुरातील मेहेरबाबा नगरात राहत होत्या... 23 नोव्हेंबरच्या संध्याकाळी शेकोटी शेकत असताना लिलाबाई च्या कपड्यांनी पेट घेतला होता आणि त्यात त्या 65% भाजल्या होत्या... कुटुंब आणि शेजाऱ्यांनी लगेच आग विझवत लिलाबाईंना रुग्णालयात दाखल केले होते... मात्र, तीन दिवस मृत्यूची झुंज दिल्यानंतर शनिवारी लिलाबाई यांचा मृत्यू झाला...