Nagpur Crime : मोबाईल दिला नाही म्हणून चणकापूरमधील 13 वर्षांच्या मुलीनं जीवन संपवलं

Continues below advertisement

Nagpur Crime : मोबाईल दिला नाही म्हणून चणकापूरमधील 13 वर्षांच्या मुलीनं जीवन संपवलं 
मोबाईल दिला नाही म्हणून नागपूर जिल्ह्यातील चणकापूर येथील जय भोले नगर परिसरात  तेरा वर्षीय दिव्या सुरेश कोठारे या आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुढे आली.  संध्याकाळी साडेसातच्या सुमारास दिव्याने मोबाईल मागितला. इंस्टाग्राम आणि व्हाट्सअप सारखी सोशल मीडिया ॲप ती नियमित वापरत होती. मोबाईलचा अतिवापर तिच्याकडून होत असल्याने अभ्यासाकडे तिचे दुर्लक्ष होत असल्याने “मोबाईल कमी वापर, अभ्यासाला प्राधान्य दे ” असा तगादा दिव्या कडे लावत होते.  शुक्रवारी घटनेच्या दिवशी आत्याच्या घरी लग्न सर्व कुटुंबीय तिकडेच होते. सायंकाळी नेहमीप्रमाणे दिव्याने मोबाईल मागितला मात्र घरच्यांनी नकार दिला. मोबाईल न दिल्याने दिव्या नाराज झाली. रागाच्या भरात ती आत्याच्या घरातून निघून सरळ  स्वतःच्या घरी आली. तेव्हा घरी कुणीच नव्हते. घरात बांधलेल्या पाळण्याच्या दोरीला तिने गळफास घेतला. काही वेळाने तिची मोठी बहीण तिला शोधत घरी आली असता हा प्रकार उघडकीस आला. तिने आत्याकडे धावत जाऊन आई-वडिलांना माहिती दिली.  घटनेची माहिती मिळताच खापरखेडा पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला पुढील तापस सुरू आहे.  मात्र या घटने सर्व पालकांना हादरून सोडले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola