Nagpur : मुंबई - नागपूर बुलेट ट्रेनबाबत DPR रेल्वे बोर्डाला सादर, समृद्धी महामार्गाजवळ रेल्वे मार्ग

Continues below advertisement

मुंबई-नागपूर प्रस्तावित बुलेट ट्रेनबाबत महत्त्वाची बातमी आहे. या प्रकल्पाचा डीपीआर म्हणजे तपशीलवार प्रकल्प अहवाल रेल्वे मंडळाला सोपवण्यात आलाय. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाजवळूनच बुलेट ट्रेनचा 700 किलोमीटरचा हा मार्ग प्रस्तावित आहे. नॅशनल हायस्पीड रेल कार्पोरेशननं गेल्या महिन्यात तयार केलेला प्रकल्प अहवाल रेल्वे मंडळाकडे सोपवण्यात आला असून त्यावर आता रेल्वे मंडळाच्या सूचनांची प्रतीक्षा आहे. मुंबई आणि नागपूर दरम्यान 10  जिल्ह्यांतून ही बुलेट ट्रेन धावणार आहे. त्यामुळे या दोन शहरांतला प्रवासाचा वेळ 12 तासांवरून 8 तासांवर येणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram