Vidharbha Flood : विदर्भाला पावसानं झोडपलं; नागपूर, वाशिम, यवतमाळ, वर्ध्यात मुसळधार

विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय. वर्ध्याच्या कारंजामध्ये वीज पडून दोन तरुणांचा मृत्यू झाला. वाशिममध्ये पंचवीस वर्षे जुन्या पाझर तलावाचा कालवा फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं. यवतमाळ जिल्ह्याला 29 जूनपर्यंत येलो अलर्ट जाहीर करण्यात आला. नागपूर, भंडारा, अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यांतही मुसळधार पाऊस झाला. रत्नागिरीत गणपतीपुळे मंदिर परिसरात समुद्राचं पाणी शिरलं, तर मीरा भाईंदर आणि वसई परिसरात उंच लाटांमुळे किनाऱ्यालगतच्या घरांमध्ये पाणी शिरलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola