Sana Khan Case : सना खान मृत्यूप्रकरणी मोबाईल फोन आणि लॅपटॉप जप्त Nagpur पोलिसांची EXCLUSIVE माहिती
Continues below advertisement
भाजपच्या अल्पसंख्यांक आघाडीच्या पदाधिकारी सना खान मृत्यूप्रकरणी एक मोबाईल फोन आणि एक लॅपटॉप जप्त करण्यात नागपूर पोलिसांना यश आलं आहे. जबलपूरमधून जप्त झालेला मोबाईल फोन सना खान यांचा असल्याची खात्रीलायक माहिती आहे. सना खान हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी अमित साहूच्या आईच्या घरातून मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आला असून नागपूर पोलिसांच्या विशेष पथकाने जप्तीची कारवाई केली आहे. एवढंच नाही तर नागपूर पोलिसांनी मुख्य आरोपी अमित साहूची पोलिग्राफ टेस्ट आणि लाय डिटेक्टर टेस्ट करण्याचं ठरवलं असून त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरु केली आहे.
Continues below advertisement