Nagpur : नागपूरात विधान परिषद निवडणूक बिनविरोध नाहीच, काँग्रेसकडून छोटू भोयर यांना उमेदवारी
Continues below advertisement
विधान परिषदेचा अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी नागपूरात नाट्यमय घडामोडी पाहायाला मिळाल्या. अखेर काँग्रेसकडून छोटू भोयर यांना उमेदवारी देण्यात आली त्यामुळे नागपुूरमध्ये चंद्रशेखर बावनकुळे विरुद्ध छोटू भोयर असा सामना पाहायला मिळणार आहे. नागपूरमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना बिनविरोध निवडून आणायचं आणि त्याबदल्यात कोल्हापूरमधून काँग्रेसच्या सतेज पाटलांना बिनविरोध निवडून आणण्याची तयारी भाजपनं दर्शवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नागपूरमध्ये काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत खल सुरू आहे, तर तिकडे कोल्हापुरात अमल महाडिक यांनी उमेदवारी मागे घ्यावी म्हणून दिल्लीतून फोन आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. या घडामोडींमध्ये संघ आणि भाजपची साथ सोडून आलेले छोटू भोयर तोंडघशी पडणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
Continues below advertisement