Nagpur | मतदारसंघात न फिरकल्याने कामठीचे आमदार टेकचंद सावरकर यांच्या निधनाची पोस्ट व्हायरल

Continues below advertisement

नागपूर : सध्या देशासह राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. असं असातानाही स्थानिक आमदार मतदार संघात फिरकले नसल्याची तक्रार कामठीमधील नागरिकांची आहे. अशा स्थितीत भाजप आमदार टेकचंद सावरकर हरवल्याची पोस्ट समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाली आहे. एवढंच नाहीतर काही अज्ञात व्यक्तींनी आमदार सावरकर यांचं कोरोनामुळं निधन झाल्याची पोस्ट व्हायरल करत त्यांना श्रद्धांजलीही वाहिली आहे. याप्रकारामुळे संतापलेल्या आमदार टेकचंद सावरकर यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 

कोरोनाची परिस्थिती गंभीर असतानाही नागपूर जिल्ह्यात एक आमदार मतदारसंघात फिरत नाही, असा आरोप कामठी येथील नागरिकांनी केला आहे. तसेच काही अज्ञातांनी आमदार हरवले आहेत, अशी पोस्ट समाज माध्यमांव व्हायरल केली आहे. तसेच काहींनी त्यांचं कोरोनानं निधन झाल्याची पोस्ट करत त्यांना श्रद्धांजलीही वाहिली आहे. या सर्व प्रकारामुळे आमदार टेकचंद सावरकर संतापले आहेत. त्यांनी समोर येत मी ठणठणीत असून मतदारसंघात फिरत आहे, असे सांगितले आहे. तसेच त्यांनी तत्काळ पोलीस स्थानकात धाव घेतली आहे. या प्रकरणी त्यांनी अज्ञातांविरोधात तक्रार दाखल केली आहे. 

या संपूर्ण घटनाक्रमानंतर आमदार टेकचंद सावरकर यांनी समाज माध्यमावर एक व्हिडीओ शेयर करत स्पष्टीकरण दिलं आहे. "मला काहीही झालेलं नसून जनतेच्या आशीर्वादाने मी सुखरूप आहे. परंतु काही समाजकंटकांनी माझं कोरोनामुळं निधन झालेलं आहे, अशा खोट्या बातम्या समाजमाध्यमांवर प्रसारित केल्या तरी त्याकडे नागरिकांनी लक्ष देऊ नये आणि अशाप्रकारच्या बातम्या समाजमाध्यमांवर फेसबुक व्हाट्सअॅपच्या आणि इतर ठिकाणी प्रसारित करणाऱ्या लोकांची माहिती माझ्या कार्यालयाला कळवावी.", असं त्यांनी सांगितलं आहे. 

दरम्यान, नागपूर जिल्ह्यातील कामठी मतदार संघातील भाजप आमदार टेकचंद सावरकर  हरविल्याची एक पोस्ट समाज माध्यमांवर चांगलीच व्हायरल होत आहे. एवढंच काय तर संकटाच्या वेळी आमदार महोदयांनी जनतेला वाऱ्यावर सोडल्याचे आरोप करत काही महाभागांनी आमदार सावरकर यांचं कोविडमुळे निधन झाल्याची पोस्ट देखील वायरल केली आहे. या संदर्भात आमदार टेकचंद सावरकर यांनी वाठोडा पोलीस स्थानकात पोस्ट वायरल करणाऱ्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे कोरोना काळात आमदार मतदार संघात फिरत नसल्याने काहींनी त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करत अनेक पोस्ट वायरल केल्या आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram