Nagpur Vaccination: नागपूर पालिकेची किमया, मिळालेल्या डोसपेक्षा जास्त जणांचं लसीकरण
Continues below advertisement
महाराष्ट्रात लशींचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे झालं आणि आता तर नागपूर महापालिकेने लशींच्या प्रत्येक थेंबाच्या वापरात किमयाच घडवली आहे. महापालिकेला सरकारकडून आजवर कोव्हीशील्ड लशींचे दहा लाख 25 हजार डोस मिळाले असताना महापालिकेने त्यातून दहा लाख 60 हजार लोकांचे लसीकरण करून दाखविले आहे. लशींच्या प्रत्येक थेंबाचा काटेकोरपणे वापर करून जास्तीत जास्त नागपूरकरांना कोरोना महामारीविरोधात सुरक्षा कवच देणाऱ्या नागपूर महापालिकेच्या या स्तुत्य प्रयत्नाबद्दलची बातमी!
Continues below advertisement