100 नंबरवर फोन केला म्हणून पोलिसांनी मारलं,मारहाणीमुळे अपमानित झाल्याने नागपूरच्या तरुणाची आत्महत्या
नागपूर पोलिसांना झालंय तरी काय? नागपूर पोलिसांची संवेदनशीलता संपली आहे का? क्राईम सिटी आणि गुन्हेपूर अशी ओळख असलेल्या नागपुरातले पोलीस गावगुंडांऐवजी सामान्य नागरिकांवर मर्दुमकी दाखवत आहेत का? आम्ही असे प्रश्न विचारण्याचे कारण म्हणजे एका महिन्याच्या कालावधीत मारकुट्या नागपूर पोलिसांवर दोघांचा जीव घेतल्याचा आरोप होतोय. सात जुलै रोजी पारडी परिसरात नाका-बंदी दरम्यान पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मनोज ठवकर या दिव्यांग ऑटोमोबाईल मेकॅनिक मृत्यूची सीआयडी चौकशी पूर्ण होण्याच्या आधीच काल रात्री नागपूर पोलिसांचा आणखी एक मारकुटा स्वरूप समोर आला आहे.