Mahavitaran Strike Nagpur : महावितरणच्या कर्मचाऱ्यांची सरकारविरोधात जोरदार घोणाबाजी

Continues below advertisement

महावितरणचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संपाला आजपासून सुरुवात झाली आहे. खासगीकरणाला विरोध करण्यासाठी महावितरणचे कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. त्यामुळं काही भागात वीज पुरवठा बंद झाल्यानं अडचणी निर्माण झाल्या आहेत. महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी आज मध्यरात्रीपासून संपावर गेलेत...तर ४० हजार कंत्राटी कर्मचार्यांनींही संपाला पाठींबा दिलाय.. दरम्यान काही तासांत; संपकरी कर्मचाऱ्यांचा सरकारवर दबाव वाढलाय... खासगीकरणाला विरोध करण्यासाठी महावितरणचे कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिलीये.. अदानी समूहाला वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करत महावितरण कर्मचाऱ्यांच्या 30 संघटनांनी हा संप पुकारला आहे. यातच संप करणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांना राज्य सरकराने आता नोटीस बजावली आहे. संपात सहभागी होणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांवर मेस्मांतर्गत कारवाई करण्याच्या इशारा सरकारने दिला आहे. दरम्यान संपाच्या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री फडणवीसांनी बैठक बोलावलीेय.दुपारी २ वाजता बैठकीला सुरुवात होणार आहे या बैठकीत तोडगा निघणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय...

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram