Nagpur :महाराष्ट्रातील काही आमदारांना मंत्रिपदाचं आमिष दाखवून त्यांच्याकडून पैेसे उकळण्याचा प्रयत्न
महाराष्ट्रातील काही आमदारांना मंत्रिपदाचं आमिष दाखवून त्यांच्याकडून पैेसे उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. नीरज सिंह राठोड असं या आरोपीचं नाव आहे.. त्याला गुजरातच्या मोरबीमधून अटक करण्यात आली. धक्कादायक म्हणजे पैसे उकळण्यासाठी तो भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या नावाचा गैरवापर करत होता. गेल्या काही दिवसांत त्यानं काही भाजप आमदारांना फोन केले होते.. आपण नड्डांच्या जवळचे आहोत असं सांगत मोठी रक्कम उकळण्याचा त्याचा प्रयत्न होता. काही आमदारांनी या भामट्याच्या दाव्यांना सत्य मानून त्याला लाखोंची रक्कम दिल्याचीही माहिती आहे... मात्र या गोष्टीला अद्याप पोलिसांकडून दुजोरा मिळू शकलेला नाही... दरम्यान नागपूर मध्यचे भाजप आमदार विकास कुंभारे यांच्याशी देखील या भामट्याने सात मे रोजी संपर्क साधला होता. कुंभारेंना संशय आला, आणि त्यांनी माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. अशी कुठलीही व्यक्ती नड्डांच्या जवळची नाही, असं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी पोलिसांत लेखी तक्रार दिली.