नागपूरमध्ये लॉकडाऊन जाहीर, कोणकोणते विभाग हॉटस्पॉट म्हणून घोषित?
नागपूरमध्ये 15 ते 21 मार्च लॉकडाऊन, दारुची दुकानं बंद राहणार, ऑनलाईन विक्री सुरू असणार
नागपूर : कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी 15 मार्च ते 21 मार्चपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडून नये, असं आवाहनही नितीन राऊत यांनी केलं आहे. नागपूर मनपा हद्दीसह कामठी, हिंगणा आणि वाडी हे तीन भाग पोलीस आयुक्त कार्यालय हद्दीत आहेत, तेथेही लॉकडाऊन असणार आहे.