Khasala Ash Lake : 'वीज केंद्रातील राख साठवणुकीच्या बांधाची उंची नियमबाह्य वाढवली' ABP Majha
Continues below advertisement
नागपूर: कोराडी वीज प्रकल्पातील (Koradi Power Plant) खासाळा राख तलावाचा (Khasala Ash Lake) बांध फुटल्याने आता नागपूरला प्रदूषणाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. या प्रकल्पामध्ये लाखो टन राख साठवण्यात आली होती, ती वाहून गेल्याने आता नागपुरातील नदी, नाले, नळयोजनेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच पुढच्या काही काळापर्यंत या परिसरातील शेतजमीन नापीक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Continues below advertisement