Jitendra Awhad : दादा भुसेंची पोलिसांसमोर युवकाला मारहाण, गुन्हा कधी नोंदवणार? आव्हडांची माहीती
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडिओ ट्वीटवर पोस्ट केला आहे. यामध्ये दादा भुसे दोन व्यक्तींना शिव्या आणि मारहाण करताना दिसतायत... व्हिडीओ पोस्ट करताना जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सवाल उपस्थित केलाय.. पोलिसांसमोर एखाद्या व्यक्तीला मारहाण करणाऱ्या मंत्री दादा भुसे यांच्यावर कारवाई कधी होणार? कायदा सुव्यवस्थेचं काय?असा सवाल त्यांनी केलाय..दरम्यान व्हायरल होणारा हा व्हिडीओ कधीचा आहे? आणि कुठला आहे? याबाबत कोणताही माहिती समोर आलेली नाही.