Nagpur Corona Guidelines : नागपुरात सर्व शासकीय, निम शासकीय कार्यालयाच्या मास्क लावणे बंधनकारक
abp majha web team
Updated at:
25 Dec 2022 05:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNagpur Coronavirus Guidelines Corona Updates: कोरोनाचा जगभरातील वाढता प्रादुर्भाव (Corona Mask) पाहता राज्यात देखील प्रतिबंधात्मक उपाय हळूहळू करायला सुरुवात झाली आहे. सर्वच जिल्हा प्रशासन सतर्क झाली असून स्थानिक पातळीवर काही निर्णय घेतले जात आहेत. राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये सर्व शासकीय, निम शासकीय कार्यालयाच्या मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. शासकीय कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांनी देखील मास्क (Corona Mask) घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. मास्क संदर्भातल्या काढलेल्या पत्रामध्ये शासकीय व निमशासकीय कार्यालयात मास्क बंधनकारक असेल असा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र हे विनंती स्वरूपात असल्याचे जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांचे म्हणणे आहे.