Remdesivir | राज्याला 21 एप्रिलनंतर रेमडेसिवीरचा अपुरा पुरवठा, सरकारचा हायकोर्टात दावा
Continues below advertisement
केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी 21 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंत ठरवलेला 4 लाख 35 हजार रेमडेसिवीरचा कोटा 28 एप्रिलपर्यंत अपुरा आला. 28 एप्रिलपर्यंत राज्याला फक्त 2 लाख 30 हजार 720 रेमडेसिवीरचं मिळाल्याचा दावा राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात केला आहे. याप्रकरणी राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. तर काही खासगी रुग्णालयांनी रेमडेसिवीरचा विनाकारण वापर केल्याचा दावाही राज्य सरकारच्या वतीने करण्यात आला आहे.
Continues below advertisement