Heavy Rains in Nagpur : संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना यंदा तिहेरी फटका

Continues below advertisement

Heavy Rains in Nagpur : संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना यंदा तिहेरी फटका बसलाय. उन्हाळ्यात अधीक तापमानामुळे अंबिया बहाराच्या फुलोऱ्यावर मोठा परिणाम झाला. त्यानंतर विदर्भात झालेल्या मुसळधार पावसानं संत्र शेतीचं मोठं नुकसान झालंय. मात्र पावसानं उसंत घेतल्यानंतर आता शेतकऱ्यांपुढे बुरशीजन्य रोगाचं मोठं संकट शेतकऱ्यांसमोर उभं आहे. एकामागोमाग आलेल्या संकटांमुळे संत्र्याची मोठ्या प्रमाणात फळ गळती होत असून जवळपास ७० टक्के संत्री पिक यामुळे नष्ट झाल्याचं शेतकरी सांगतायत..जी परिस्थिती संत्र्याची आहे तीच मोसंबी पिकाची स्थिती आहे. सरकारने, कृषी विभागाने त्वरित याकडे लक्ष द्यावे. औषधोपचार बद्दल शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे अशी मागणी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram