Nagpur Rain : नागपूर भंडारा रोडवर नाग नदीला पूर; नदीचं पाणी शिरलं शेतात , पीकांचं मोठं नुकसान
नागपूर भंडारा रोडवर "कापसी महालगाव" परिसरात नाग नदीला पूर आला आहे... त्यामुळे नाग नदीचा पाणी पात्र सोडून अवतीभवतीच्या धानाच्या ( तांदूळ ) शेतात शिरलाय... त्यामुळे धानाच्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे...
नागपूर शहरातून अवघ्या काही फुटांचा पात्र असलेली नाग नदीने महालगाव परिसरात विक्राळ रूप धारण केले आहे.. त्यामुळे नाग नदीचा पाणी नेहमीचा पात्र सोडून अवतीभवतीच्या कित्येक किलोमीटर क्षेत्रामध्ये पसरल्यामुळे शेतीचा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालाय...
महालगाव मध्ये काही घरांमध्येही नाग नदीचा पाणी शिरल्यामुळे नागरिकांच्या घरगुती साहित्याचाही नुकसान झालाय...
नाग नदीच्या अवतीभवती मोठ्या प्रमाणावर भाजीची शेती होते... ती भाजी नागपूर शहराला पुरवली जाते... या पुरामुळे भाज्यांचे उत्पादनावर ही विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे...
नागपूर शहरात वीस - पंचवीस फुटांचा पात्र असलेली नाग नदीने महालगाव परिसरात किती मोठा स्वरूप घेतला आहे... कदाचित यावर नागपूरकरांचा विश्वासही बसणार नाही...