Gangster Jayesh Pujari Calls Nitin Gadkari : नितीन गडकरींना गँगस्टर जयेश पुजारीने धमकावल्याचा आरोप

Continues below advertisement

Gangster Jayesh Pujari Calls Nitin Gadkari : नितीन गडकरींना गँगस्टर जयेश पुजारीने धमकावल्याचा आरोप


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आलेल्या धमकीच्या फोन कॉल प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित कॉल एका सराईत गँगस्टर ने केले असून तो सध्या बेळगाव तुरुंगात कैदेत आहे.. तुरुंगाच्या आत त्याच्याकडे नियमबाह्य पद्धतीने असलेल्या फोनच्या माध्यमातून त्याने हे कॉल केल्याचे समोर आले आहे. गडकरी यांच्या कार्यालयात फोन कॉल च्या माध्यमातून धमकी देणाऱ्या गुन्हेगाराचे नाव जयेश पुजारी असून तो हत्या प्रकरणातबेळगाव जेलमध्ये कैदेत आहे. यापूर्वी 2016 मध्ये तो जेल तोडून पळून गेला होता. शिवाय त्याने जेलमधूनच अशाच पद्धतीने अनेक वेळा पूर्वी ही मोठे अधिकारी आणि इतरांना धमकीचे कॉल केल्याची माहिती आहे. गडकरी यांच्या कार्यालयात देण्यात आलेल्या धमकी मागे एकटा जयेश पुजारी आणि त्याची टोळी आहे... की अंडरवर्ल्डचे काही मोठे गॅंगस्टर यामागे आहे... याचा तपास सध्या पोलीस करत आहे. नागपूर पोलिसांची एक टीम तातडीने बेळगावला रवाना झाली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram