Ganesh Visarjan 2021 : नागपूर मनपाकडून 248 कृत्रिम हौद तयार, शांततेत नियम पाळत बाप्पाचं विसर्जन

Continues below advertisement

नागपुरात घरगुती गणपतींचे विसर्जन फुटाळा आणि इतर तलावांवर महानगरपालिकेकडून तयार करण्यात आलेल्या कृत्रिम टॅंकमध्ये सुरू झाले आहे. या वर्षी नागपूर शहरातील सर्व तलावांमध्ये घरगुती गणपतीच्या विसर्जनावर बंदी घालण्यात आली आहे. लोकांच्या सोयीसाठी महानगरपालिकेने 248 कृत्रिम टॅंक तयार केले असून त्या ठिकाणी मूर्तीचं स्वीकार करून महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून विसर्जन पार पाडले जात आहे. नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या घरातील गणपती मूर्तीचे आज सकाळी पोलिस आयुक्तांच्या कुटुंबियांनी स्वतः एका कृत्रिम टँक वर येऊन विसर्जन केले. पर्यावरणाचे रक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी असून प्रत्येक कुटुंबाने ती जबाबदारी पार पाडली. तर उत्सव पर्यावरण पूरक होऊ शकेल असे मत पोलीस आयुक्तांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केले. तसेच आज पोलीस आपल्या घरचा सण सोडून बंदोबस्त करत आहेत त्यामुळे दिवसभर बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांचे निर्देश लोकांनी पाळावे असे आग्रह ही पोलीस आयुक्तांच्या कुटुंबियांनी केले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram