Nagpur : नागपुरात विदर्भवाद्यांचं चार दिवसांपासून उपोषण, सरकारकडून आंदोलनाची दखल नाही

वेगळा विदर्भाच्या मागणीसह विदर्भातील अनेक प्रकल्पांना होत असलेल्या दिरंगाईबाबत नागपुरात माजी आमदार वामनराव चटप यांच्या नेतृत्वात विदर्भवादी गेल्या चार दिवसांपासून उपोषण करत आहेत. उपोषणकर्त्यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वृद्ध विदर्भवादी कार्यकर्ते गेले चार दिवस आंदोलन करत असताना सरकारने अजूनही आमच्या आंदोलनाची दखल घेतलेली नाही, असा विदर्भवाद्यांचा आरोप आहे. ३१ डिसेंबरपर्यंत उपोषणाच्या माध्यमातून शांततेने आंदोलन करु, मात्र, त्यानंतर कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करुन गनिमीकावा केला जाईल, असा इशारा विदर्भवाद्यांनी दिला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola