Anil Deshmukh : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरी ईडीची छापेमारी
Continues below advertisement
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने छापे टाकले आहेत. सकाळपासून त्यांच्या घरात झाडाझडती सुरु आहे. दरम्यान कारवाई दरम्यान अनिल देशमुख सध्या नागपुरात नाहीत, शिवाय ते मुंबईतही नसल्याचं कळतं. अनिल देशमुख दिल्लीत असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या 100 कोटी रुपयांच्या कथित वसुलीप्रकरणात अनिल देशमुख यांना राज्याच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आज (25 जून) ईडीने त्यांच्या नागपुरातील घरात छापेमारी सुरु केली आहे. ईडी वेगवेगळे कनेक्शन या प्रकरणात तपासू पाहत आहे.
Continues below advertisement