Nagpur E-Panchnama : ई-पंचनाम्यांचा प्रयोग 100 टक्के यशस्वी, शेतीच्या नुकसानीचे अचूक पंचनामे

Continues below advertisement

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे नुकसान झाल्यानंतर प्रशासनाकडून केली जाणारी पंचनाम्याची प्रक्रिया आणि त्यानंतर सरकारकडून मिळणारी भरपाई अधिक वेगानं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे. त्यासाठी ई- पंचनाम्याचे प्रयोग नागपूर जिल्ह्यात शंभर टक्के यशस्वी झालेत. जुलैच्या शेवटी आणि ऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यात पूर्व विदर्भात ई-पंचनाम्याचा प्रयोग राबविण्यात आला होता. अतिवृष्टी झाली की महसूल विभागाचे तलाठी आणि कृषी विभागाचे सेवक हे कायम निवडक शेताच्या बांधावर जाऊन पंचनामे करायचे. त्यामुळे अनेक शेतकरी या भरपाईपासून वंचित राहायचे. मात्र ई-पंचनामा प्रक्रियेमध्ये तलाठी आणि कृषी सेवकांवर प्रत्यक्ष शेतावर जाऊन जीपीएस तंत्राद्वारे शेतीच्या नुकसानीची माहिती ॲप वर भरणे, नुकसानीचा प्रत्यक्ष फोटो अपलोड करणे बंधनकारक करण्यात आलंय. त्यामुळे शेतीच्या नुकसानीचे अचूक पंचनामे होऊ लागले आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram