RSS Dussehra Melava 2020 | धर्मनिरपेक्षतेचं नाव घेऊन समाज तोडण्याची भाषा कुणी करु नये : मोहन भागवत
Continues below advertisement
सत्ता प्रत्येकाला हवी असते. सत्तेसाठी संघर्ष करतानाही विवेक वापरायला हवा. निवडणुकांमध्ये वैचारिक लढा हवा, युद्ध नको. सामाजिक अंतर निर्माण करणं हे राजकारण नाही. निवडणूक ही एक स्पर्धा आहे. ही स्पर्धा खेळीमेळीनं व्हावी, असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी विजयादशमी उत्सवात अवघ्या 50 लोकांच्या उपस्थितीत संबोधन केले. यावेळी स्वयंसेवक डिजिटली या विजयादशमी कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी मोहन भागवत म्हणाले की, धर्मनिरपेक्षतेचं नाव घेऊन समाज तोडण्याची भाषा कुणी करु नये, असंही मोहन भागवत म्हणाले. कुठल्याही स्थिती सामाजिक भान समजून व्यक्त होणं गरजेचं असल्याचं देखील ते म्हणाले. संविधानाचं आणि अहिंसेचं पालन आपल्याला करायचं आहे. भडकाऊ बोलणाऱ्यांपासून सावध राहण्याची गरज आहे. परस्पर विश्वासाचं वातावरण बनवून प्रत्येक समस्येचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे, असं मोहन भागवत म्हणाले.
Continues below advertisement