Devendra Fadnavis : कर्नाटक सरकारच्या बोलघेवड्यांची अमित शाहंकडी तक्रार करणार : देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राच्या विधिमंडळात सीमा प्रश्नाचा  ठराव झाल्या नंतर त्याचे पडसाद बेळगावात सुरू असलेल्या कर्नाटक विधिमंडळात उमटले.मुंबई केंद्रशासित करा अशी मागणी कर्नाटकचे उच्च आणि शिक्षणमंत्री सी. एन. अश्वथ्य नारायण यांनी केला असून मुंबईत वीस टक्के कन्नडिग असल्याचा जावईशोध त्यांनी लावला आहे. बेळगाव केंद्रशासित करायची असेल तर आम्हालाही मुंबई केंद्रशासित करण्याची मागणी करता येते असे नारायण म्हणाले. महाजन आयोगाने केलेल्या शिफारशी महाराष्ट्राने फेटाळल्या आहेत.त्यामुळे आता महाजन आयोगाचाही काही प्रश्न नाही. महाराष्ट्राने दाखल केलेला सर्वोच्च न्यायालयातील खटला टिकणार नाही. प्रश्न सोडवण्याचा अधिकार संसदेला आहे. आम्ही शांतताप्रिय आहोत आम्ही कधीच महाराष्ट्रातील कन्नड जनतेला फुस लावत नाही.सीमाप्रश्न संपलेला असून याबद्दल चर्चा देखील करू नये असेही नारायण म्हणाले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola