Devendra Fadnavis : महाराष्ट्रात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना सोडणार नाही : फडणवीस
एनआयए आणि एटीएसनं केलेल्या कारवाईविरोधात पीएफआयनं ठिकठिकाणी निदर्शनं केली. पुण्यात केलेल्या निदर्शनांच्या वेळी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्याचे व्हीडिओ व्हायरल झालेत. या व्हीडिओतील घोषणांची पुष्टी एबीपी माझा करत नाही. पुणे पोलिसांनीही पुण्यात अशा घोषणा दिल्या गेल्या नाहीत, असं स्पष्ट केलंय. महाराष्ट्रात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्याऱ्यांना सोडणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय