Devendra Fadnavis Nagpur Speech:जोपर्यंत हा देवा भाऊ आहे, तोपर्यंत..; लाडकी बहीणवरुन विरोधकांना टोला
नागपूरच्या रेशिमबाग मैदानावर राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी लाडकी बहिण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे कार्यक्रम आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित दादा पवार यांच्या उपस्थितीत होत आहे.. या कार्यक्रमात महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे ही उपस्थित आहे...
हजारोंच्या संख्येने महिला या कार्यक्रमात उपस्थित असून पेंडोल मध्ये बसायला जागा शिल्लक नाही... त्यामुळे शेजारचे सुरेश भट सभागृहात ही महिलांच्या बसण्याची व्यवस्था करावी लागली आहे...
देवेन्द्र फडणवीस -
महायुतीने अनेक चागल्या योजन्या आल्यात
लाडकी बहिण योजनेच्या विरोधात राजकारण करतायत
योजना बंद करण्यासाठी विरोधक न्यायालयात जातायत
योजना सुरू झाली तेव्हा योजना अमलात येणार नाही, दहा टक्के महिलांना पैसे मिळणार नाही अशी वल्गना आमच्या mva चे नेते करत होते.. महिलांना विचारा खात्यात पैसे पोहोचले की नाही... मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजुरे खुदा होता हैं..