Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांविरोधातील याचिकेवर आज सत्र न्यायालयात निकाल?
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आजचा दिवस महत्त्त्वाचा आहे. कारण २०१४ मधील त्यांच्याशी संबंधीत एका प्रकरणाचा निकाल आज दिला जाऊ शकतो. फडणवीसांनी २०१४ मधील विधानसभा निवडणुकीच्या शपथपत्रात दोन गुन्ह्याची नोंद केली नव्हती. या प्रकरणी सतीश उके यांनी याचिका दाखल केली होती.